पुण्यात तिहेरी हत्याकांड, Continuation of murder in Pune

पुण्यात तिहेरी हत्याकांड

पुण्यात तिहेरी हत्याकांड
www.24taas.com,पुणे

पुणे तिहेरी हत्याकांडानं हादरले आहे. दोन महिला आणि एका लहान मुलीची हत्या करण्यात आलीय. वानवडी परिसरातील उदयबागमध्ये ही घटना घडली आहे.

दरोड्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. चंपारत्ना सोसायटीमध्ये मासाळकर कुटुंबीय राहतात. विश्वजीत मसलकर हे नोकरीवरून रात्री आठच्या सुमारास परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यांची आई शोभा, पत्नी अर्चना आणि दोन वर्षाची मुलगी किमया यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं त्यांना आढळलं.

धारदार शस्त्रांनी त्यांची हत्या करण्यात आली होती. मसलकर यांच्या शेजारी राहणारे मधुसुदन कुलकर्णी या घटनेत जखमी झालेत.

First Published: Friday, October 5, 2012, 13:45


comments powered by Disqus