शरद पवारांचं वादग्रस्त वक्तव्य Controversial statement about Muslims by Sharad Pawar

शरद पवारांचं वादग्रस्त वक्तव्य

शरद पवारांचं वादग्रस्त वक्तव्य
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

मालेगाव बॉम्बस्फोटातील १७ मुस्लिम तरुण आणि इशरत जहाँ व्यवस्थेचे नाहक बळी ठरले असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केलंय. आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाला समर्थन देतानाच आता मुस्लिमांबाबत ही थेट भूमिका घेतल्यानं निवडणुकांवर डोळा ठेवून पवारांनी वक्तव्य केल्याचं बोललं जातंय.

मालेगाव स्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेले मुस्लिम तरुण निर्दोष असल्याचं आपण तेव्हाच सांगितलं होतं. मात्र व्यवस्थेतल्या दोषामुळं त्या तरुणांना तीन वर्षे नाहक तुरूंगात जावं लागल्याचंही पवारांनी नमूद केलं. इशरत जहाँ ही निर्दोष होती आणि त्यामुळंच एन्काऊंटर करणा-या अधिका-यांना तरुंगात जावं लागल्याचं त्यांनी सांगितलंय. यावेळी सूडवृत्तीचं समर्थनही शरद पवारांनी केलं. एखाद्या घटनेचा राग डोक्यात ठेवून एखाद्यानं गुन्हा केला, तर त्याला दोषी धरता येणार नाही असं खळळजनक विधान शरद पवारांनी केलं.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतलीय. येत्या महिनाभरात उमेदवारांची नावं ठरवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीय. येत्या १२ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्षांची संयुक्त बैठक होणार असून या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचं पवारांनी सांगितलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 10, 2013, 18:19


comments powered by Disqus