Last Updated: Friday, August 31, 2012, 20:36
www.24taas.com, कोल्हापूर जयप्रभा स्टुडिओ विक्रीप्रकरणी कोल्हापूर दिवाणी न्यायालयानं गानसम्राज्ञी लता मंगशकर यांना नोटीस पाठवलीय.
लता मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओ २६ ऑगस्ट रोजी एका बिल्डरला तब्बल ११ कोटींना विकला होता. यानंतर स्टुडिओचा वापर व्यापारासाठी केला जाऊ नये यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळानं एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुरु असेलेल्या सुनावणी दरम्यान कोल्हापूर दिवाणी न्यायालयानं लता मंगेशकर यांना स्टुडिओची विक्री का केली गेली, याबाबत विचारणा केलीय. त्याचसोबत स्टुडिओचा मूळ उद्देश कुठे गेला? असा प्रश्नही कोर्टानं यावेळी उपस्थित केलाय.
First Published: Friday, August 31, 2012, 20:35