Last Updated: Tuesday, April 2, 2013, 16:10
www.24taas.com, पुणे एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) कायद्याला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिलाय. एलबीटीविरोधक व्यापाऱ्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे.
‘विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशन’नं एलबीटीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं एलबीटीला स्थगिती देण्यास नकार दिलाय. हायकोर्टाच्या या निर्णयाला ‘विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशन’ सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे.
दरम्यान, पुण्यात आजही एलबीटीविरोधात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. पुण्यातल्या मंडई ते महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. एलबीटीविरोधात कालही पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय. आज व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून आपला विरोध दर्शवला. तर एलबीटी कर लागू करण्याबाबत राज्य सरकार ठाम आहे. जे व्यापारी ३० दिवसांच्या आत नोंद करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं संबंधित महापालिकेच्या आयुक्तांनी स्पष्ट केलंय.
First Published: Tuesday, April 2, 2013, 16:10