शिर्डीत ‘साई उत्सव’… भिक्षा मागण्यासाठी भाविकांची झुंबड , dasara ustsav in shirdi

शिर्डीत ‘साई उत्सव’… 'माई, भिक्षाम देही'ची हाक

शिर्डीत ‘साई उत्सव’… 'माई, भिक्षाम देही'ची हाक
www.24taas.com, शिर्डी

सर्वांना ‘सबका मालिक एक’ म्हणत मानवतेचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचा आज ९४ वा पु्ण्यतिथी उत्सव... हा उत्सव शिर्डीत दसरा उत्सव म्हणून मोठया उत्साहाने साजरा केला जातो.

दसरा उत्सवात सामील होण्यासाठी शिर्डीत मोठया प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. दसऱ्याच्या पावन दिवशी साईंचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक कामाची सुरवात केली जाते. शिर्डीमध्ये असताना साईबाबांनी एका फकिरासारकं जीवन व्यतीत केलं. दररोज गावातल्या पाच घरी जाऊन साईबाबा भिक्षा मागत आणि हीच आणलेली भिक्षा आधी गोरगरीबांना वाटत आणि नंतर स्वत: खात. याच साईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आजही शिर्डीतील ग्रामस्थ आणि साई संस्थान शिर्डीतील घरोघरी झोळी घेऊन भिक्षा मागतात.

शिर्डीकरही मोठया आस्थेनं आपल्या दारी आलेल्यांना धान्यरुपाने भिक्षा प्रदान करतात. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सर्व ग्रामस्थ एकत्र साई मंदिरातून निघत सिमोल्लंघनही करतात.

First Published: Wednesday, October 24, 2012, 17:20


comments powered by Disqus