Last Updated: Sunday, September 16, 2012, 22:21
www.24taas.com, पिंपरी-चिंचवडपिंपरी चिंचवडमध्ये एका विवाहितेला सासरच्या मंडळींनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. नवविवाहिता प्रियांका गालफाडे हिचे हात पाय बांधून जाळण्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडलाय. या नवविवाहितेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अमरावतीमध्ये काही दिवसांपूर्वी गर्भवती नवविवाहितेला सासरच्या मंडळींनी जिवंत जाळलं. या घटनेत या नवविवाहितेचा मृत्यू झाला.. अशीच काहीशी घटना आता पिंपरी चिंचवडमध्ये घडलीय. एका विवाहितेला सासरच्या मंडळींनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना गिगडी परिसरात घडलीय. प्रियंका गालफाडे असं या नवविवाहितेचं नाव असून तिचे हात पाय बांधून जाळण्याचं संतापजनक कृत्य त्यांनी केलंय. या घटनेनंतर प्रियंकाची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आलीय..
प्रियंकाला जिवंत जाळण्यामागं हुंड्यासाठी छळ की अन्य कोणतं कारण आहे याचा पोलीस तपास करतायत... अमरावतीमध्ये गर्भात स्त्री अर्भक असल्यानं नवविवाहितेला जिवंत जाळण्यात आलं होतं.. या दोन्ही घटनांमुळं पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रात चाललंय काय असा सवाल उपस्थित करण्यात येतोय..
First Published: Sunday, September 16, 2012, 22:21