दाऊदच्या मुसक्या बांधणार - गुहमंत्री सुशीलकुमार शिंदे, Dawood Ibrahim bring to India - Sushil Kumar

दाऊदच्या मुसक्या बांधणार - गुहमंत्री सुशीलकुमार शिंदे

दाऊदच्या मुसक्या बांधणार - गुहमंत्री सुशीलकुमार शिंदे
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर

अफजल गुरु आणि कसाबनंतर आता दाऊदला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. दाऊदचा पत्ता हाती लागला असून त्याल मुसक्या बांधण्यासाठी अमेरेकेच्या FBIची मदत घेतली जात असल्याचंही शिंदेंनी सांगितलंय.

सोलापुरात BSFच्या बटालियन केंद्राची पायाभरणी आज त्यांच्या हस्ते झाली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला लवकरच भारतात आणणार, असा पुनरुच्चार शिंदे यांनी केला आहे. दाऊदच्या हालचालींवरही त्यांचं लक्ष आहे. त्यामुळे सगळं योग्य झालं तर दाऊदला लवकरच भारतात आणू, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री झाल्यानंतर २६/११ मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब आणि संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरु यांना फासावर लटकवण्यात आलं होतं. आता त्याच साखळीत १९९३ मुंबई साखळी स्फोटाचा सूत्रधार दाऊदला भारतात आणण्याचा इरादा शिंदे यांनी बोलून दाखवला आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Wednesday, January 8, 2014, 23:01


comments powered by Disqus