श्रुतिकानं सांगितलं मी कोल्हापूरला येतेय, पण..., Dead body found in Nira river out of four Missing youngsters

श्रुतिकानं सांगितलं मी कोल्हापूरला येतेय, पण...

श्रुतिकानं सांगितलं मी कोल्हापूरला येतेय, पण...
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

पुण्यातून पाच दिवसांपूर्वी गायब झालेल्या चौघांपैकी एक तरुण, चिंतन बूच याचा मृतदेह सापडलाय. नीरा नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडलाय. पुणे पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र अन्य दोन तरुण आणि एका तरुणीबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, श्रुतिकानं आदल्याच दिवशी नोकरीचा राजीनामा दिला होता. आणि दुस-या दिवशी घरी येणार, असं कोल्हापूरला घरच्यांना कळवलं होतं. पण दुस-या दिवळी श्रुतिका पोहोचलीच नाही.

चिंतनसह साहिल कुरेशी, प्रणव लेले आणि श्रुतिका चंदवानी हे चौघेही १ नोव्हेंबरच्या रात्री कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले. श्रुतिकाला कोल्हापुरात सोडून तिघं गोव्याला जाणार होते. रात्री २ च्या सुमारास त्यांनी पुणे-बेंगळुरू महामार्गावर खेड-शिवापुर टोल नाका क्रॉस केला. त्यानंतर मात्र या चौघांचा कुठलाही ठावठिकाणा लागलेला नाही. अखेर आज चिंतनचा मृतदेह सापडल्यानं घटनेचं गूढ अधिक वाढलंय. त्यांच्या गाडीला एखादा अपघात झाला की काही घातपाताचा प्रकार आहे, हे सखोल तपासाअंतीच स्पष्ट होऊ शकेल.

पुण्यातले हे चौघे मित्र १ तारखेला रात्री पुण्यातल्या बाणेरमधून निघाल्यानंतर त्यांनी खेड-शिवापूर टोलनाका गाठला. याच टोलनाक्यावर ते आणि त्यांची गाडी शेवटची दिसली. या तिघांबरोबर जी श्रुतिका चंदवानी होती, तिला हे तिघे वाटेत कोल्हापूरला सोडणार होते. श्रुतिकानं आदल्याच दिवशी नोकरीचा राजीनामा दिला होता. आणि दुस-या दिवशी घरी येणार, असं कोल्हापूरला घरच्यांना कळवलं होतं. पण दुस-या दिवळी श्रुतिका पोहोचलीच नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली आणि हा सगळा प्रकार उघड झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Wednesday, November 6, 2013, 22:34


comments powered by Disqus