Last Updated: Thursday, September 19, 2013, 23:23
ww.24taas.com, झी मीडिया, पुणेपुण्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे येरवड्यामधल्या लक्ष्मीनगर भागात असलेल्या दफन भूमीची भिंत कोसळली त्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी झालाय.
आनंदा भिलारे, सुधाकर भिलारे यांच्या सह दहा वर्षीय अक्षय भिलारे, आणि सात वर्षीय पल्लवी भिलारे या चिमुरड्यांचा अंत झालाय.. ही घटना काल रात्री साडे दहाच्या सुमाराला घडलीय.
पुण्यातील येरवड्याचा भाग डोंगरानजिक असल्याने या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. गेल्या काही काळापासून येथील रहिवास्यांची दुसऱ्या ठिकाणी राहाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी मागणी होत आहे. या घटनेनंतर येथील स्थानिकांना येरवड्यातून दुसरीकडे कधी हलवले जावे अशी मागणी पुन्हा वाढू लागली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, September 19, 2013, 23:23