Last Updated: Thursday, April 18, 2013, 18:11
www.24taas.com, मुंबईपुणे जर्मन बेकरी स्फोटातील प्रमुख आरोपी हिमायत बेगला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. १७ जणांच्या मृत्यूला हिमायत बेग जबाबदार आहे. त्यामुळे त्याला फाशी होते की जन्मठेप याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. अखेर सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
त्याआधी कोर्टासमोर बोलताना हिमायतने आपला स्फोटांशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं. तसंच आपण शिक्षक असल्याची नौटंकी केली. हिमायत बेगवर हत्येचा कट रचने, बॉम्बस्फोटचा कट, लोकांच्या मृत्यूला जबाबदार, दहशतवादी कृत्य आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.
१३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्याच्या जर्मन बेकरीत दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर ६४ जण जखमी झाले होते.
First Published: Thursday, April 18, 2013, 18:11