Last Updated: Thursday, August 22, 2013, 11:08
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपिंपरी-चिंचवड जवळील देहू रोड इथ झालेल्या अपघातात PMPML च्या दोन तपासानिकांचा मृत्यू झालाय तर दोनजण गंभीर जखमी झालेत. नंदकुमार किरणकुमार राजपूत, विठ्ठल कृष्णा माळी अस मृत तपासानिकांची नाव आहेत.
हे दोघे देहू फाट्याजवळ बसच्या प्रवाश्यांची तिकीट तपासत असताना भर धाव ट्रकनं या चौघांना चिरडलं. त्यात नंदकुमार किरणकुमार राजपूत, विठ्ठल कृष्णा माळी यांचा जागीच मृत्यू झाला तर किसन महादू चपटे आणि गंगाराम साळुंखे हे दोघे गंभीर जखमी झालेत.
घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झालाय. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत. पीएमपीएमएलच्यावतीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 22, 2013, 11:08