डेंग्युनं मुंबई-पुणेकरांची उडवली झोप; तिघांचा बळी, dengue in mumbai - pune

डेंग्युनं मुंबई-पुणेकरांची उडवली झोप; तिघांचा बळी

डेंग्युनं मुंबई-पुणेकरांची उडवली झोप; तिघांचा बळी
www.24taas.com, मुंबई - पुणे

यश चोप्रांचा बळी घेणाऱ्या डेंग्यूनं मुंबई आणि पुण्यात हातपाय पसरायला सुरूवात केलीय. मुंबईत डेंग्यूनं तीन जणांचा बळी घेतलाय. तर शहरात आत्तापर्यंत १४१ रुग्णांची नोंद झालीय.

डासांच्या प्रादुर्भावानं डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढलीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्युच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं सांगण्यात येतंय. मुख्य बाब म्हणजे डेंग्यूचे रुग्ण झोपडपट्टी भागातले नसून सर्वाधिक रुग्ण मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या ठिकाणी आढळलेत. महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या १६१ असून खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्या यापेक्षाही अधिक असल्याचं सांगण्यात येतंय. पिंपरी चिंचवडमध्येही डेंग्यूची स्थिती चिंताजनक असल्याचं स्पष्ट झालंय. महिन्याभरात पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल १३ रुग्ण आढळलेत. जानेवारीपासून शहरात तब्बल ४६ जणांना डेंग्यूची लागण झालीय.

दरम्यान, महापालिकेनं अंधेरी इथल्या यशराज स्टुडीओमध्ये जाऊन कारंजाची साफसफाई केली. तिथं इडिसा इजिप्त मच्छरचं ब्रिडींग असल्याचं आरोग्य कर्मचाऱ्यांनाना आढळलं. यश चोप्रांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बामणे यांनी याबाबत माहिती दिली.

First Published: Monday, October 22, 2012, 16:25


comments powered by Disqus