दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुर्णत्वाचा दाखलाच नाही, Dinanath Mangeshkar hospital issue

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुर्णत्वाचा दाखलाच नाही

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुर्णत्वाचा दाखलाच नाही
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धघाटन होणार आहे. मात्र उद्धाघटन होत असलेल्या हॉस्पिटलच्या इमारतीला महापालिकेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही.

फक्त हॉस्पिटलच्या तळमजल्यावरील फक्त स्वागत कक्षाला महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. तेही घाई घाईत मिळवलेले दिसतेय. कारण, उद्घाटन १ तारखेला होतेय. तर तळमजल्यावरील भोगवटा प्रमाणपत्र ३० ओक्टोंबरला देण्यात आलय. हॉस्पिटलकडे महापालिकेची विविध करांची ६१ लाखाहून अधिक थकबाकी होती.

ती हॉस्पिटलने याच महिन्यात म्हणजे, १८ ओक्टोंबरला भरली आहे. म्हणजे उद्घाटनाला काही दिवस बाकी असताना थकबाकी भरण्यात आली आहे. म्हणजे उद्घाटन नसते तर ती देखील भरण्यात आली नसती. असे दिसतेय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, November 1, 2013, 00:13


comments powered by Disqus