कोल्हापुरात पोलिसांची ग्रँड मस्ती, मद्यधुंदावस्थेत गस्त!Dunk and Drive of Police In Kolhapur

कोल्हापुरात पोलिसांची ग्रँड मस्ती, मद्यधुंदावस्थेत गस्त!

कोल्हापुरात पोलिसांची ग्रँड मस्ती, मद्यधुंदावस्थेत गस्त!
www.24taas.com , झी मीडिया, कोल्हापूर

मद्यधुंद अवस्थेत असताना गस्त घालण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या व्हॅनला रात्री कोल्हापुरात अपघात झालाय. या अपघातात पोलीस व्हॅन वीजेच्या खांबावर जावून आदळली. त्यामुळं संतप्त जमावानं वाहनचालक चंद्रकांत कामत यांच्यासह पोलीस गाडीत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चांगला चोप देत पोलीस व्हॅनवर हल्ला चढवला.

गाडीत गस्त घालण्यासाठी जाणारे सगळेच पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्यानं हा अपघात झालाय. ज्या ठिकाणी ही व्हॅन जावून आदळली. त्या ठिकाणाबून काहीच अंतरावरून घरं होती. जर व्हॅन वीजेच्या खांबावर आदळली नसती तर जिवीतहानीही झाली असती.

मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना नागरिकांनी मारहाण केल्यामुळं काही पोलीस जखमी झालेत. त्यांच्यावर कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालया उपचार सुरू असून त्यांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आलेत. गस्तीसाठी असणारे पोलीस कर्मचारीच दारू पिऊन गस्त घालत असतील तर नागरिकांची सुरक्षा पोलीस काय करणार असा सवाल या घटनेच्या निमित्तानं उपस्थित होतोय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 7, 2013, 11:23


comments powered by Disqus