बारामतीत पतीने सोने-पैशासाठी पत्नीचे नाक, कान कापले, ear, nose, cropped in Baramati

बारामतीत पतीने सोने-पैशासाठी पत्नीचे नाक, कान कापले

www.24taas.com, झी मीडिया, पुणे

एक लाख रुपये आणि २ दोन तोळं सोन्यासाठी पतीनेच पत्नीचे केस कापल्याची अघोरी घटना बारामतीमधल्या डोर्लेवाडी गावात घडलीय. पत्नीचे केस कापण्यावर या नराधमाचं समाधान झालं नाही. त्यानं तिचे नाक आणि कान कापून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.

या नराधमाचं नाव मारुती निंबाळकर असं आहे.. १२ वर्षापूर्वी त्याचं पीडित महिलेशी लग्न झालं.. गेल्या सहा महिन्यांपासून पती शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय.सोमवारी मात्र त्यानं कहरच केला.. पत्नीचे हातपाय बांधून त्यानं मारहाण केली. केस, नाक आणि कान कापण्याचा प्रयत्न केला.

तब्बल दोन तासांनंतर शेजरच्या महिलांनी या पीडित महिलेची नराधमाच्या तावडीतून सुटका केली.. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.. त्यानुसार पोलिसांनी नराधमाविरोधात गुन्हा दाखल केलाय..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 3, 2013, 12:24


comments powered by Disqus