Last Updated: Friday, July 19, 2013, 23:24
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षेकेच्या पूर्व प्रियकराने त्याच्याच पत्नीसमोर आपल्यावर बलात्कार केला आणि पिस्तूलचा धाक दाखवून त्याच्या पत्नीने एमएमएस बनवला असा आरोप एका महिलेने केला आहे. पीडित महिलेचा घटस्फोट झाला आहे.
विवाहित असतानाही पूर्व प्रियकराने आपल्याशी प्रेमाचं नाटक केलं आणि घरात घुसून बलात्कार केला. बलात्कारावेळी पूर्व प्रियकराची पत्नीही घरात होती. तिने पिस्तूलचा धाक दाखवून सर्वप्रकार मोबाईलमध्ये शूट केला, असा पीडित महिलेचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेची तक्रार दाखल केली आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही.
संबंधित महिला मूळची धुळे जिल्ह्यातील असून सध्या पुण्यात राहते. तिला अकरा वर्षाचा एक मुलगाही आहे. एका मित्राच्या माध्यमातून धुळ्याच्याच असलेल्या मनोज नावाच्या व्यक्तीशी तिची ओळख झाली. त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. लग्नाचं आश्वासन देवून मनोजशी अनेकदा शरिरसंबंध आला. पण, तो विवाहित असल्याचं समजल्यानंतर महिलेने त्याच्याशी संबंध तोडला.
५ मे २०१३ ला मनोज एका महिलेला घेवून आपल्या घरी आला. ती आपली पत्नी असल्याचे त्याने सांगितले. तिच्या हातात पिस्तूल होते. ते दाखवत तिने पती मनोजला पीडित महिलेवर बलात्कार करण्यास सांगितले. यावेळी पीडित महिलेच्या शरिरावर अनेक ठिकाणी सिगारेटचे चटकेही देण्यात आले. बलात्काराची ही सर्व घटना पूर्व प्रियकर मनोज याच्या पत्नीने मोबाईलमध्ये शूट केली. पोलिसांना माहिती दिल्यास तुझ्या मुलाला मारून टाकू, अशी धमकीही तिने दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
मनोज आणि त्याची पत्नी फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. पुणे पोलिसांचं एक पथक तपासासाठी धुळ्याला रवाना झालं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, July 19, 2013, 23:24