माजी क्रिकेटपटू अभिनेता सलिल अंकोलाच्या पत्नीची आत्महत्याEx-cricketer Actor Salil Ankola`s wife atte

माजी क्रिकेटपटू अभिनेता सलिल अंकोलाच्या पत्नीची आत्महत्या

माजी क्रिकेटपटू अभिनेता सलिल अंकोलाच्या पत्नीची आत्महत्या
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

माजी क्रिकेटपटू अभिनेता सलिल अंकोलाची पत्नी परिणीती अंकोलानं रविवारी दुपारी स्वत:ला फाशी लावून आत्महत्या केली. सलिल अंकोलापासून विभक्त झाल्यानंतर मागील काही वर्षांपासून परिणीती आपल्या माहेरी राहत होती.

परिणीताच्या घरचे सर्व सदस्य एका लग्नाला गेले असता तिनं रविवारी दुपारी फाशी लावून घेतली. पुण्यातल्या सलिसबरी पार्क या परिसरात परिणीतीचं माहेर आहे. पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडलं. आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नाही, असं या नोट मध्ये लिहिलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सलिल अंकोला आणि परिणीती काही काळापासून वेगळे राहत होते. त्यांना दोन मुलं सुद्धा आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “एका लग्नाला उपस्थित राहून जेव्हा परिणीतीचे आई-वडील घरी परतले. तेव्हा त्यांना परिणीतीला फासावर लटकलेलं पाहून धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलवलं.मृतदेग ससून हॉस्पिटलमध्ये ठेवलाय.” सलिल अंकोलालाही संपर्क साधला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 23, 2013, 11:34


comments powered by Disqus