कोल्हापुरात खतांची कृत्रिम टंचाई, शेतकरी हवालदील, fake shortage of fertilizer in kolhapur

कोल्हापुरात खतांची कृत्रिम टंचाई, शेतकरी हवालदील

कोल्हापुरात खतांची कृत्रिम टंचाई, शेतकरी हवालदील

www.24taas.com, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापुरात वरुणराजा बरसण्यास सुरुवात झालीय... शेतीच्या कामांनाही वेग आलाय.. मात्र शेतक-यापुढं उभं राहिलंय मोठं संकट... व्यापा-यांनी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केल्यानं बळीराजा अडचणीत सापडलाय..

कोल्हापुरात मान्सून वेळेत बरसला आणि शेतकरीराजा सुखावला... त्यामुळं मान्सूनच्या सुरुवातीला शेतीच्या कामांना वेग आलाय...

पेरणीच्या कालावधीत शेतकरी पिकांना खत देतात... त्यामुळं खताची मोठ्या प्रमाणात खरेदी होते... मात्र कोल्हापुरात शेतक-यांच्या गरजेचा व्यापारी गैरफायदा घेत असल्याचं समोर आलंय..

अनेक व्यापा-यांनी युरिया, अमोनियम सल्फेट, सुफला या सारख्या रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केलीय.. मात्र हेच व्यापारी दुसरीकडे चढ्या दरानं खताची विक्री करत शेतक-यांना लुबाडत असल्याचे शेतकरी शिवाजी पोवरा आणि विश्वास चौगुले यांनी सांगितले.

खताची पुरेशी उपलब्धता असल्याचा दावा कृषी अधिकारी करतायत.. शिवाय शेतक-यांना लुटणा-या व्यापा-यांवर कारवाईसाठी भरारी पथकं नेमल्याचंही सरकारी उत्तर कृषि विकास अधिकारी सुरेश जमादार यांनी दिले आहे.

दुष्काळानं रडवल्यानंतर वेळेत हजेरी लावलेल्या वरुणराजामुळे शेतकरी आनंदित झाला... मात्र आता व्यापा-यांकडून खतांसाठी फसवणूक होत असल्यानं बळीराजा दाद मागावी कुणाकडे असा सवाल बळीराजानं उपस्थित केलाय..


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 15, 2013, 21:55


comments powered by Disqus