Last Updated: Sunday, February 24, 2013, 19:53
www.24taas.com, सांगलीसांगली जिल्ह्यातल्या वायफळे इथं एका शेतक-यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भीमराव नलावडे असं या शेतक-याचं नाव आहे.
सुझलॉन या पवनऊर्जा निर्मिती कंपनीनं फसवणूक केल्यामुळे कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यांच्या शेतात सुझलॉननं पवनचक्की उभारली होती. याचा कोणताही मोबदला देण्यात आला नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे नलावडे यांनी कंटाळून याच टॉवरवर गळफास लावून घेतला. नलावडेच्या कुटुंबियांना भरपाई मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह उतरवू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.
मात्र प्रशासन आणि सुझलॉनच्या अधिका-यांनी याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यानं अखेर ग्रामस्थांनी हा मृतदेह खाली उतरवला.
First Published: Sunday, February 24, 2013, 19:53