लग्न जमत नाही म्हणून मुलीचा घेतला जीव, father killed daughter because her marriage postporn

लग्न जमत नाही म्हणून मुलीचा घेतला जीव...

लग्न जमत नाही म्हणून मुलीचा घेतला जीव...
www.24taas.com, पैठण

मुलीचं लग्न जमत नाही म्हणून जन्मदात्या पित्याने आपल्या मुलीचा जीव घेतलाय. पैठण तालुक्यातील बिडकीन गावात ही धक्कादायक घटना घडलीय. मुलगी दिसायला चांगली नाही, लठ्ठ आहे म्हणून हीचे लग्नच होणार नाही या भितीने या पित्याने आपल्या मुलाच्या मदतीने आपल्या मुलीचा बळी घेतलाय.

मुलीचे लग्न जमत नसल्यानं सय्यद शब्बीरनं माणुसकीला आणि बापाच्या नात्यालाही काळीमा फासत आपल्या पोटच्या मुलीचा बळी घेतलाय. मुलगी लठ्ठ आणि ठेंगणी असल्यानं तिला पाहण्यास येणाऱ्यांनी लग्नाला नकार दिल्याच्या रागातून या नराधमाने आपल्या मुलीला संपवायचा कट आखला. सुरुवातीला आत्महत्येसारखे वाटणारे हे प्रकरण पोस्टमार्टम रिपोर्टनंतर खून प्रकरण असल्याचं उघड झालं आणि सगळ्यांनाच धक्क बसला. या मुलीवर पहिल्यांदा विषप्रयोग करण्यात आला आणि त्यानंतर गळा आवळून या मुलीचा खून करण्यात आल्याचं समोर आलंय.

सय्यद शब्बीर यांना सहा मुली आणि एक मुलगा आहे. एका आजारात मोठ्या मुलीचे निधन झाले. एका मुलीचे लग्न त्यांनी केले मात्र लठ्ठ आणि ठेंगणी असल्याने या मुलीचे लग्न जमत नव्हते. जर असंच राहील तर आपल्या अन्य दोन मुलींच्या लग्नाला उशीर होईल, अशी भीती बाळगून त्यानं आपल्या मुलीची जीवनयात्रा संपवली. या जगात असेही पिता पाहिल्यावर नात्यांमध्ये प्रेम जिवंत आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

First Published: Friday, January 18, 2013, 22:33


comments powered by Disqus