Last Updated: Thursday, July 11, 2013, 21:29
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूरपावसाळ्यात का होईना पण सरकारला तहानलेल्या दुष्काळग्रस्त सोलापूरकरांची अखेर आठवण झालीय. सोलापूरकरांसाठी अखेर उजनी धरणाचे पाणी सोडण्यात आलंय.
भीमा नदी आणि डाव्या-उजव्या कालव्यातून पाच टीएमसी पाणी सोडण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत माहिती दिलीय. यामुळं सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सोलापूरकरांनी उजनीतून पाण्या सोडण्याची गेल्या कित्तेक दिवसांपासून मागणी केली होती.
भैय्या देशमुख यांनी तर आझाद मैदानावर तब्बल सहा महिने आंदोलन छेडलं होतं. तर काल विजयसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, July 11, 2013, 21:29