Last Updated: Tuesday, January 28, 2014, 21:33
www.24taas.com, कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील राजगड पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
`टोल मागण्यासाठी कोणी आडवे आले, तर तुडवून काढा`, असा आदेशच राज ठाकरे यांनी नवी मुंबईत दिला होता. त्यानंतर राज्यभरात टोलनाक्याची तोडफोड सुरू झाली.
राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात पुन्हा टोलनाक्याच्या मुद्यावरून धुमशान पेटण्याची चिन्हं आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांच्यावर परप्रांतियांविषयी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल झाला होता.
यानंतर मुंबई, नाशिक आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं, तसेच भीतीने परप्रातियांनी आपला गावही गाठला होता.
राज ठाकरे यांच्या या आदेशानंतर अजित पवार यांनी कुणी कायदा हातात घेतला, तर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.
यानंतर आज मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरही मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तो़डफो़ड केली आहे. या प्रकऱणी कप्तान मलिक यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 28, 2014, 19:25