पुण्यात इमारतीला आग, २५ वाहनं जळून खाक, एकाचा मृत्यूFire at Anudatt Appartment of Pune, 1 dead, 25 b

पुण्यात इमारतीला आग, २५ वाहनं जळून खाक, एकाचा मृत्यू

पुण्यात इमारतीला आग, २५ वाहनं जळून खाक, एकाचा मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यातल्या अर्पाटमेंटमध्ये आग लागून जवळपास २५ वाहनं जळून खाक झाली आहेत. शनिवार पेठेतील अनुदत्त अपार्टमेंटमधील ही घटना आहे.

आज पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. या आगीत एका रहिवाशाचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

पुण्याच्या नवी पेठ भागातील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या अनुदत्त इमारतीला
आगीमुळं आवारातील २५ दुचाक्या आणि दोन सायकल जळून खाक झाल्या. दरम्यान, पाऊण तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 23, 2013, 09:15


comments powered by Disqus