स्टेट बँकेची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी!, fire in sbi building in pune

स्टेट बँकेची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी!

स्टेट बँकेची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी!
www.24taas.com, पुणे

पुण्यातल्या हिराबाग चौकामधल्या स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आज पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीचं नेमक कारण अजून समजलेलं नाही.

पुण्यातल्या मध्यवर्ती परिसरात असलेल्या टिळक रोडवर ही शाखा आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीनं आग अटोक्यात आणली. आगीत स्टेट बॅँक ऑफ इंडियाचं ऑफिस भस्मसात झालंय. महत्त्वाची कागदपत्रंही आगीत नष्ट झाल्याचं समजतंय.

आगीची माहिती मिळाल्यानंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केलीय. या आगीत मोठं नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

First Published: Wednesday, March 6, 2013, 08:11


comments powered by Disqus