Last Updated: Friday, July 5, 2013, 08:12
www.24taas.com, झी मीडिया, पुणे पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे भरचौकात अर्जुन घुले यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे निधन झाले.
सिंहगड रस्त्यावर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी घुले यांच्यावर गावठी बंदुकीने गोळीबार केला. तर कोयता आणि चॉपरच्या साहाय्याने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाले. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. घुले हे नांदोशी (ता. हवेली) गावचे माजी सरपंच आहेत.
घुले यांच्यावर दीड वर्षांपूर्वीही खडकवासला परिसरात हल्ला झाला होता. घटनास्थळाहून पोलिसांनी बंदूक, दोन कोयते आणि एक चॉपर जप्त केलाय. या हल्ल्याची माहिती मिळताच दत्तवाडी पोलीस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. *
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, July 4, 2013, 15:18