अज्ञात व्यक्तींकडून टोल कर्मचाऱ्यावर गोळीबार, Firing on Toll employee

अज्ञात व्यक्तींकडून टोल कर्मचाऱ्यावर गोळीबार

अज्ञात व्यक्तींकडून टोल कर्मचाऱ्यावर गोळीबार
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

अज्ञात व्यक्तींनी टोल कर्मचाऱ्यावर गोळीबार केल्याची घटना खेड-शिवापूर टोल नाक्यावर घडली आहे. मंगळवारी रात्री घटना घडली.

या घटनेत टोल कर्मचारी सुरेश खोमणे जखमी झालेत. टोल भरण्याच्या कारणावरुन त्यांची अज्ञात व्यक्तींशी शाब्दिक बाचाबाची झाली. या वादातूनच ही फायरिंग झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. तर दुसरीकडे गोळीबारात जखमी झालेल्या खोमणे यांच्यावर उपचार सुरु आहेत.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 16, 2013, 11:07


comments powered by Disqus