कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले, Flow Over Koyna dam

कोयना ओव्हर फ्लो, सतर्कतेचा इशारा

कोयना ओव्हर फ्लो, सतर्कतेचा इशारा
www.24taas.com,कोयना

राज्यात समाधानकारक पाऊस पडल्याने अनेक धरणात चांगला पाणीसाठा झाला. राज्यातील सर्वात मोठे कोयना धरण पूर्ण भरले आहे. या धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून बाजूच्या गावाना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरणातील पाणीसाठा १०५.६७ टीएमसी इतका झाला आहे. यामुळे धरणातून २२,००० कुसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे सहा दरवाजे चार फूट उघडण्यात आले आहेत.

धरणातील पाणाच्या विसर्गाने कोयनानगर धक्कापुल पाण्याखाली गेला आहे. तसंच ३७ गावांचा संपर्क तुटला आहे. कोयना नदी पात्रालगतच्या सातारा,सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कर्नाटक राज्यातील एकूण २७८ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असला तरी, जिल्ह्यातील दुष्काळी भागात मात्र अजुनही पाऊस पडलेला नाही. माण, खटाव, फलटण, कोरेगाव हे तालुके मात्र अजूनही कोरडेच आहेत.

First Published: Wednesday, September 5, 2012, 20:45


comments powered by Disqus