फेसबुकवर मैत्री अन् बलात्काराच्या तक्रारीत शेवट!Friendship On facebook then he attempt rape on Her i

फेसबुकवर मैत्री अन् बलात्काराच्या तक्रारीत शेवट!

फेसबुकवर मैत्री अन् बलात्काराच्या तक्रारीत शेवट!
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात अगदी लग्नापर्यंत प्रकरण गेलं. त्या काळात दोघांत शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले पण त्यानं लग्नाला नकार देताच फेसबुकवरील या मैत्रीच्या सिलसिल्याचा शेवट बलात्काराच्या तक्रारीत झाला आहे. याप्रकरणी पुण्यातील सहकारनगर परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय युवतीनं २५ वर्षीय युवकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी सिराज टेमसू वाडिया (२५, कोंढवा) याच्यासह आणखी तिघांविरूद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित पीडित तरूणी पुण्यातील सहकारनगर परिसरात राहते. तिची ओळख गेल्या वर्षी सिराजसोबत झाली. या दोघांत मैत्री झाली आणि पुढं प्रेमात रूपांतर झालं. या काळात सिराजनं संबंधित तरूणीला लग्नाची मागणी घातल्याचं तक्रारीत म्हटलंय. त्यामुळं आम्हा दोघांत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि मात्र काही काळानंतर त्यानं लग्नाचा विषय काढण्यास टाळाटाळ सुरु केली.

दरम्यान, 29 वर्षीय युवतीला आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच सिराजच्या घरी कल्पना दिली. त्यांनीही आम्ही तुला ओळखत नाही आमच्या मुलापासून लांब राहा, असा सल्ला दिला. त्यामुळं चिंतित झालेल्या युवतीनं अखेर सिराज आणि त्याच्या कुटुंबियांविरू्दध तक्रार दाखल केली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 14:23


comments powered by Disqus