शिवसेनेचे बाबर मनसेच्या वाटेवर?, Gajanan Babar to join MNS

शिवसेनेचे बाबर मनसेच्या वाटेवर?

शिवसेनेचे बाबर मनसेच्या वाटेवर?
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीच्या आधीच राजकीय फटाके फुटायला सुरुवात झालीय. शिवसेना खासदार गजानन बाबर हे मनसेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेन राजकीय वातावरण ढवळून निघालंय. मावळ लोकसभा संघात पुन्हा तिकीट मिळणार नाही हे लक्षात आल्यानं बाबर शिवसेना सोडणार अशी चर्चा आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये लोकसभा उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु झालीय. मावळ लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा सुरक्षित मतदार संघ समजला जातो. त्यामुळे विद्यमान खासदार गजानन बाबर पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करतायत. पण त्यांच्याच पक्षातल्या श्रीरंग बारणे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केलीय. या वेळी बारणे यांना तिकीट मिळणार असं बोललं जातंय. गजानन बाबर यांना तिकीट नाकारलं तर ते मनसेत जाणार, अशी चर्चा सुरू आहे. खुद्द बाबर यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावलीय. आणि उमेदवारीवरचा दावा कायम ठेवलाय.

दुसरीकडे बाबर यांना आव्हान देणा-या बारणे यांनी याबाबत वक्तव्य टाळलंय. मात्र उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचंही स्पष्ट केलंय.

मावळ लोकसभा मतदार संघावर वरकरणी राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. आता जागा वाढवण्यासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेतली गटबाजी फायद्याची ठरण्याची चिन्हं आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 29, 2013, 23:28


comments powered by Disqus