वारजे इथं अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारGang Rape on Minor Girl in Warje

वारजे इथं अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

वारजे इथं अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एका मागोमाग एक बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडतांना दिसतायेत. वारजे इथं पंधरा वर्षांच्या विद्यार्थिनीला जबरदस्तीनं मित्राच्या घरी नेऊन त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

बलात्कार करणाऱ्या चौघांपैकी दोन तरुणही अल्पवयीन आहेत. वारजे पोलिसांनी दोघांना अटक केली अजून दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतलंय. अमीर हुसेन सय्यद (वय १८) आणि अनिल राजू पवार (वय १८, दोघे रा. वारजे) अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. तर, दोन सतरा वर्षांच्या मुलांना ताब्यात घेतलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे ओळखीचे आहेत. पीडित मुलीला शनिवारी दुपारी साडेतीन वाजता शाळा सुटल्यानंतर यातील एका अल्पवयीन आरोपीनं, लग्न करशील का, म्हणत जबरदस्तीनं मोटार सायकलवर बसवून एका मित्राच्या घरी नेलं. त्या ठिकाणाहून आरोपी अमीर सय्यद यानं त्या मुलीस गणपती माथा इथल्या एका बंद बसमध्ये नेऊन पहिल्यांदा बलात्कार केला.

त्याचा मित्र पवार याला मुलीनं मैत्रिणीकडे सोडण्यास सांगितले. त्यानं तिला सोडतो म्हणून दांगट वस्ती इथं नेऊन बलात्कार केला. त्यानंतर त्यानं त्याच्या अल्पवयीन मित्राला घरी सोडण्यास सांगितलं. त्यानंसुद्धा रात्री दीड वाजता त्या मुलीस जवळच्या एका पत्र्याच्या खोलीत नेऊन बलात्कार केला. सकाळी सहा वाजता मुलीला अमीर याच्या ताब्यात दिलं.

अमीर यानं पुन्हा त्या मुलीस वारजे माळवाडी इथल्या पाण्याच्या टाकीजवळील एका खोलीत नेऊन बलात्कार केला. सकाळी साडेआठ वाजता सर्व आरोपी एकत्र जमले. त्यांनी त्या मुलीस हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. मुलीनं घरी गेल्यानंतर हा प्रकार सांगितला. त्यानंतर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 8, 2014, 16:06


comments powered by Disqus