Last Updated: Saturday, November 23, 2013, 20:53
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर विधवा महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेवून तिच्यावर सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोलापुरात घडलीय.
या प्रकरणी सोलापूर शहराच्या जेल रोड पोलिसांनी सात जणांना अटक केलीय. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून उर्वरित सहा जणांना २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संबंधित महिलेचे मल्लेश शिंगरे या युवकाशी प्रेमसंबंध होते. हे दोघे जण एकांतात फिरत असताना त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या दोघांनी महिलेला जबरदस्तीनं हॉटेलमध्ये नेलं... आणि त्यानंतर तिथं आलेल्या इतर आरोपींनी आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला. महिलेचा प्रियकरही तिथेच उपस्थित होता, पण त्याने वेळीच पोलिसांना माहिती न दिल्याने पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 23, 2013, 20:53