सांगलीत गॅस सिलिंडर स्फोटात 6 ठार, 1 जखमी, Gas cylinders Blast in sangali

सांगलीत गॅस सिलिंडर स्फोटात 6 ठार, 1 जखमी

सांगलीत गॅस सिलिंडर स्फोटात 6 ठार, 1 जखमी
www.24taas.com, झी मीडिया, सांगली

सांगली शहरातल्या वारणाली भागात गॅस सिलिंडरचा स्फोट झालाय. या दुर्घटनेत चव्हाण कुटुंबातले सहा जण ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झालाय. दोन जखमींना बाहेर काढण्यात यश आलं.

या स्फोटात घरातील सर्व साहित्य जाळून खाक झालंय. जखमी झालेल्या सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गॅस सिलिंडरचा स्फोट नेमका कशामुळं झाला हे कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

संदीप अपार्टमेंटमधील विठ्ठल चव्हाण यांच्या रुममध्ये हा स्फोट झाला. दुर्दैवाने चव्हाण कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. या स्फोटामुळे घराचंही नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमका काय प्रकार घडला, हे सुरुवातीला कोणालाच समजत नव्हते. त्यामुळे पळापळ झाली.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 3, 2014, 11:47


comments powered by Disqus