मामानंच केला भाचीचा बलात्कार आणि खून, girl raped & murder by uncle in sangli

मामानंच केला भाचीचा बलात्कार आणि खून

मामानंच केला भाचीचा बलात्कार आणि खून
www.24taas.com, झी मीडिया, सांगली

नात्याला काळिमा फासणारी घटना सांगलीमध्ये घडलीय. चुलत मामानंच भाचीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केलाच पण, त्यानंतर तिची हत्या करून तिला शेतात पुरून टाकल्याची घटना उघडकीस आलीय.

सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातली ही धक्कादायक घटना... माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेत नराधम मामानं सात वर्षीय भाचीचे अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करुन निर्दयीरित्या खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेतात पुरून टाकला. वैष्णवी शिरसाट असं या मृत बालिकेचे नाव आहे.

दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपी चुलत मामा विठ्ठल आटूगडे याला कोकरूड पोलिसांनी अटक केलीय.


व्हि़डिओ पाहा



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 8, 2013, 11:07


comments powered by Disqus