Last Updated: Sunday, October 14, 2012, 22:37
www.24taas.com,पुणेपिंपरी चिंचवडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडलीय.. प्रियंका मुराडे असं या तरुणीचं नाव आहे. पिंपरी चिंचवडच्या उद्यमनगर परिसरात ती रहात होती.मात्र तिनं लिहलेल्या सुसाईड नोटमुळं आत्महत्येचं गूढ वाढलंय.
आयटी कंपनीत काम करणारी ही आहे प्रियंका मुराडे. २२ वर्षीय या तरुणीनं शनिवारी रात्रीच्या सुमारास पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.. मात्र आत्महत्यापूर्वी तिनं लिहलेल्या सुसाईड नोटमुळं या घटनेचं गूढ वाढलंय.. आत्महत्येसाठी आईवडिल आणि कुटुंबीयांना जबाबदार धरु नये असं प्रियंकानं या सुसाईड नोटमध्ये लिहलंय. शिवाय कुटुंबीयांवर खूप प्रेम असल्याचंही तिनं या चिठ्ठीत लिहलंय.
आयटी कंपनीत काम करणा-या सुशिक्षित आणि सुखवस्तू कुटुंबातल्या प्रियंकानं आत्महत्या केल्यानं पिंपरी आणि परिसरात खळबळ उडालीय.. त्यातच प्रियंकाच्या सुसाईड नोटमुळं पोलीसही चकीत झालेत. त्यामुळं प्रियंकाच्या आत्महत्येचं नेमकं कारण शोधण्याचं आव्हान पोलिसांपुढं असणार आहे
First Published: Sunday, October 14, 2012, 21:59