भाडेकरूंची माहिती कळवा, अन्यथा कारवाई, give tenant information to police

‘भाडेकरूंची माहिती कळवा, अन्यथा कारवाई’

‘भाडेकरूंची माहिती कळवा, अन्यथा कारवाई’
www.24taas.com, पुणे
पुण्यामध्ये नुकत्याच झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाया आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. अशी माहिती पुरवली नाही तर घरमालरकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आलेत.

नोकरी-कामधंद्यानिमित्त अनेक परप्रांतिय पुणे आणि पिंपरी - चिंचवडमध्ये स्थिरावू लागलेत. मात्र त्यांच्याबरोबर दहशतवाद आणि गुन्हेगारीला चालना देणाऱ्या व्यक्ती देखील शहरात येत असल्याचं अलिकडेच पुण्यात घडलेल्या बॉम्बस्फोटानं लक्षात आलंय. या व्यक्ती शहरात भाड्यानं खोली घेऊन राहतात. अशा भाडेकरूंची शेजाऱ्यांनाही फारशी माहिती नसते. त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरातील सर्व घरमालकांनी भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देण्याचे आदेश जारी करण्यात आलेत. ही माहिती दिली नाही तर घरमालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या निर्णयाचं घरमालकांनीही स्वागत केलंय.

घरमालकांच्या निष्काळजीपणामुळे भाडेकरूंची माहिती ठेवली जात नसल्याचे आढळून आलंय. भोसरीत स्थानिक नागरिकांच्या शेकडो खोल्या भाड्याने देण्यात आल्या आहेत. धावडे वस्ती, चक्रपाणी वसाहत, गवळीनगर, शांतीनगर आणि भोसरी गावठाण या भागात मोठ्या प्रमाणावर भाडेतत्वावर खोल्या देण्यात आल्या आहेत. सतत बदलणाऱ्या भाडेकरुंमुळे घरमालकांनी त्यांची माहिती घेण्याबाबत निष्काळजीपणा दाखवला जातो. तो निष्काळजीपणा दूर व्हावा हीच अपेक्षा...

First Published: Wednesday, August 22, 2012, 09:15


comments powered by Disqus