महालक्ष्मीच्या शालूची ७.५ लाखांत विक्री, Goddess Mahalakshmi`s cloth auctioned in 7.5 lacs

महालक्ष्मीच्या शालूची ७.५ लाखांत विक्री

महालक्ष्मीच्या शालूची ७.५ लाखांत विक्री
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

तिरुपती इथल्या तिरुमल्ला देवस्थानकडुन करवीर निवासीनी महालक्ष्मीला दसऱ्याच्या मुहुर्तावर अर्पण केलेल्या शालुचा आज लिलाव करण्यात आला. हा शालु इचलकंरजी इथले उद्योगपती अशोक रामचंद्र जांभळे यांनी 7 लाख 50 हजार रुपये किमंताला खरेदी केला.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं सुरवातीला या शालुची किमंत 1 लाख 51 हजार इतकी लावली. त्यानंतर भक्तांनी मोठ्या उत्साहान बोली लावायला सुरवात केली त्यानंतर अखेर इचलकरंजी इथले उद्योजक रामचंद्र जांभळे यांनी 7 लाख 5 हजार रुपयांची सर्वाधीक बोली लावत हा शालु लिलावात विकत घेतला.

या लिलावात पुणे, चंदगड, इचलकरंजी आणि कोल्हापूर इथल्या भक्तांनी सहभाग घेतला होता. या शालुची मुळ किमंत 87 हजार इतकी आहे.दसऱ्याच्या दिवशी हा शालु महालक्ष्मी देवीला परिधान केला गेला होता. शारदीय नवरात्रोत्सवामध्ये अष्टमीला अनन्य साधारण महत्व असतं. या दिनाचं औचित्य साधुन तिरुमल्ला देवस्थानकडुन महालक्ष्मी देवीला मानाचा देण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी ही तिरुपतीची पत्नी असल्यामुळं दरवर्षी तिरुमल्ला देवस्थान समितीकडुन हा शालु येतो.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, November 10, 2013, 15:24


comments powered by Disqus