Last Updated: Monday, November 25, 2013, 11:12
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरभाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी कोल्हापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात तोफ डागलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बेईमानीची औलद असून हे मंत्रीमंडळ म्हणजे अलीबाबा चाळीस चोर असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय.
आपण सत्तेवर आलो तर तिहारचं जेलही कमी पडेल कारण सत्ताधा-यांना तिकडेच पाठवावं लागेल अशा तिखट शब्दात मुंडेनी सरकारवर निशाणा साधला...कोल्हापुरात महायुतीचा परिवर्तन निरधार परिषदेत ते बोलत होते..
.गांधी मैदानात झालेल्या या महायुतीच्या कार्यक्रमात आरपीआयचे रामदास आठवले आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाईही हजर होते..
उस दारासाठी खासदार राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेलं आंदोलन योग्य आहे. कारण शरद पवार यांनीच रेणुका शुगर मार्फत परदेशातील साखर आयात करुन देशातील साखरेचे भाव पाडले, असा आरोपही मुंडे यांनी केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, November 25, 2013, 11:12