शरद पवार म्हणजे घोटाळेचं- मुंडे, Gopinath mundhe on sharad pawar

शरद पवार म्हणजे घोटाळेचं- मुंडे

शरद पवार म्हणजे घोटाळेचं- मुंडे
www.24taas.com, झी मीडिया, कराड

शरद पवार यांनीच IPL जन्माला घातली. शरद पवार म्हणजे घोटाळे असं समीकरण असल्याचा घणाघात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी IPL वर टीकास्त्र सोडलं असलं तरी मात्र त्याच वेळी IPL बंद होऊ नये, प्रामाणिकपणे खेळ खेळला जावा अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

आज मुंडेंनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर प्रार्थना केली. सरकारच्या कामकाजाबाबत पश्चाताप करण्यासाठी आपण आल्याचं ते म्हणाले. सरकारला सद्बुद्धि मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 5, 2013, 15:36


comments powered by Disqus