शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा उत्साह Guru Pournima in Shirdi

शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा उत्साह

शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा उत्साह
www.24taas.com, झी मीडिया, शिर्डी

शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली आहे. साईनामाचा जयघोष करत शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. ‘सबका मालिक एक’ असा संदेश देणा-या साईबाबांना आपला गुरू मानत असंख्य भाविक साईचरणी आपली भक्ती प्रकट करतात...

साईंची नगरी शिर्डी सजली आहे. गुरु शिष्याची परंपरा असलेला गुरुपौर्णिमा उत्सव... त्यामुळं साईंना गुरु मानत त्यांच्या चरणी माथा टेकण्यासाठी लाखो भाविक साईनगरीत दाखल झालेत. साईनामाचा जयघोष करत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्साहाला वाजतगाजत सुरुवात झाली आहे. पहाटेच्या काकड आरतीनंतर साई मंदिरातून साईंची प्रतिमा, वीणा आणि साईसच्चरित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. पालखी साईंच्या व्दारकामाईपर्यंत नेण्यात आली आणि त्यानंतर तिथं अखंड पारायण वाचन करुन गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली.

ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता लाखो साईभक्त शिर्डीत पायी दाखल होतात.. खास गुरुपौर्णिमेनिमित्त राज्याच्या कानाकोप-यातून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्यात.

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाईनं मंदिर सजवण्यात आलंय... तर पुणे इथल्या एका साईभक्ताने तब्बल 20 लाखांची फुलं साईचरणी अर्पण केलीत.. या फुलांनी मंदिर सजवण्यात आलंय.

साईंचे भक्त राज्यातच नाहीतर देशविदेशात पसरलेत.. वर्षानुवर्षे वाढत जाणारी साईभक्तांची संख्या पाहता यंदा प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलीय.. शिवाय बुद्धगया स्फोट आणि दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथक, शीघ्र कृती दल, बाँम्बस्कॉड, डाँग स्कॉड तैनात करण्यात आलंय.. असं असलं तरी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सारेच साईनामात दंग झालेत...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, July 21, 2013, 17:47


comments powered by Disqus