विद्यार्थिनीचा विनयभंग : उपप्राचार्याला अटक, Harassment of students about the arrest of the deputy principal

विद्यार्थिनीचा विनयभंग : उपप्राचार्याला अटक

विद्यार्थिनीचा विनयभंग : उपप्राचार्याला अटक
www.24taas.com,पुणे

पुण्यातील डॉन बॉस्कोच्या उपप्राचार्य म्हणजेच फादरला विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. इज्यू फलकावू असं या फादरचं नाव आहे.

साठहून अधिक वय असलेल्या या फादरने शाळेतील दहावीत शिकाणा-या एका मुलीला २ जानेवारीला ऑफिसमध्ये बोलावलं आणि त्यानंतर दरवाजा बंद करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

घाबरलेल्या मुलीने बाहेर येवून तिच्या मैत्रिणींना हा प्रकार सांगितला. त्यानंतर या मुलीने घाबरून शाळेत जाणं बंद केलं होतं. मात्र मुलीच्या घरच्या लोकांनी तिला विश्वासात घेतल्यानंतर तिनं घडलेला प्रकार सांगितला.

येरवडा पोलिसांनी विनयभंग आणि बलात्काराचा प्रयत्न या दोन गुन्ह्याखाली फादर फलकावूला अटक केलीय. त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

First Published: Tuesday, January 22, 2013, 19:53


comments powered by Disqus