Last Updated: Saturday, February 16, 2013, 20:21
www.24taas.com, कोल्हापूरविवाहबाह्य संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षीय मुलाचा शारीरिक छळ केल्याची धक्कादयक घटना कोल्हापूरात उघडकीस आली आहे. राजारामपुरी भागातल्या एका विवाहीत महिलेचे माणिक मेलगेडे या तरुणाशी विवाबबाह्य संबंध होते.
या संबंधित महिलेचा सहा वर्षांचा मुलगा अडथळा ठरत होता. त्यामुळे मेलगुडेने या मुलाला अनेकदा मारहाण केली. त्याला सिगारेटचे चटकेही दिले. सिगारेटचे चटके दिल्याचे आणि चावा घेतल्याच्या अनेक खुणा या मुलाच्या अंगावर आहेत.
या घटनेची माहिती शिवसैनिकांना मिळताच त्यांनी राजारामपुरीतल्या या महिलेच्या घरी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी मेलगुडेला पोलिसांच्या ताब्यात दिले.
First Published: Saturday, February 16, 2013, 20:11