health minister digvijay khanvilkar died

माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचं निधन

माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचं निधन
www.24taas.com, पुणे

महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांचं आज पुण्यात निधन झालं. पुण्यांतील बाणेर येथे त्यांोना ह्दयविकाराचा झटका आला होता.

खानविलकर हे गुरुवारी संध्याकाळी मुंबईहून पुण्याकडे जात होते. मात्र वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

एकदा राज्यवमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेल्या् खानविलकरांनी करवीर मतदारसंघातून पाच वेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. प्रथम काँग्रेस आणि नंतर राष्ट्रववादी काँग्रेसतर्फे त्यां नी निवडणूक लढवली. राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या स्थापनेत त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती.

First Published: Thursday, August 9, 2012, 22:40


comments powered by Disqus