Last Updated: Wednesday, January 15, 2014, 21:35
www.24taas.com, झी मीडिया, पुणे पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये एक हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघड झालंय. कोरेगाव पार्कमधल्या मीरा नगर सोसायटीमध्ये छापा घालून सहा तरुणींची पोलिसांनी सुटका केली.
यावेळी, या मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या एजंटलाही पोलिसांनी अटक केलीय. सुटका करण्यात आलेल्या पाच मुली परप्रांतीय आहेत, तर एक तरुणी पुण्याची आहे, अशी माहिती कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबले यांनी दिलीय.
कोरेगाव पार्क हा उच्चभ्रू परिसर आहे. या परिसरात या आधीही अशा प्रकारची सेक्स रॅकेट्स अनेक वेळा उघडकीस आलीत. मात्र, या प्रकारांवर पोलीस स्वत:हून कारवाई करत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या घटनेतसुद्धा नगरसेवक आणि नागरिकांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 15, 2014, 21:35