Last Updated: Friday, July 26, 2013, 20:18
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपुणे ग्रामीण पोलिसांनी दरोडेखोरांची मोठी टोळी जेरबंद केली आहे. बँकांवर आणि त्यातही जिल्हा मध्यवर्ती बँकांवर ही टोळी दरोडे टाकायची. बॅंकेवरील एका दरोड्याच्या तयारीत असतानाच या टोळीला जेरबंद करण्यात आले.
शिरूर तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका शाखेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत हि टोळी होती. त्यावेळी या टोळीला पकडण्यात आले. सुरेश काशिनाथ उमक हा या टोळीचा मोहरक्या आहे. सुरेश उमकने फक्त पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ८ ते १० बँकांवर दोरोडे टाकले आहेत. पुण्याबरोबरच राज्यात आणि राज्याबाहेर देखील अनेक बँकांवर उमकने दरोडे टाकले आहेत. मागील वीस वर्षापासून उमके बँकाना लक्ष करत आला आहे. उमके इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे. त्याचा उपयोग करत, तो गॅस कटरच्या सहाय्यानं बँका फोडायचा आणि बँकेची इलेक्ट्रॉनिक सुरक्षा यंत्रणा निकामी करायचा.
उमके चार वेगवेगळ्या नावाने वावरायचा. तसेच आपली ओळख लपवण्यासाठी त्याने चेहऱ्यावर कॉस्मेटिक सर्जरी देखील केली आहे...
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, July 25, 2013, 23:49