Last Updated: Monday, April 15, 2013, 11:54
www.24taas.com, पुणे पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेग याला शिवाजी सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
हिमायत बेगवर हत्येचा कट रचने, बॉम्बस्फोटचा कट, लोकांच्या मृत्यूला जबाबदार, दहशतवादी कृत्य आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याला दोषी ठरविण्यात आल्यानंतर शिक्षेची सुनावणी १८ एप्रिल रोजी होणार आहे.
पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. खटल्याशी संबधी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. १३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्याच्या जर्मन बेकरीत दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर ६४ जण जखमी झाले होते.
First Published: Monday, April 15, 2013, 11:51