Last Updated: Friday, August 10, 2012, 20:45
www.24taas.com, साताराअजित पवारच बॉम्बस्फोटाचे खरे सूत्रधार शोधून काढतील. त्यांनाच गृहखाते द्यावे. आर. आर. पाटील यांच्याकडील गृहखाते काढून घ्या. अजित पवारांकडेच हिंमत आहे अशी उपरोधिक टीका मनसेचे नेते आमदार बाळा नांदगावकर यांनी केली.
सातारा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चा काढला होता. शेतकर्यांुचं कर्ज माफ करावं, पाणी, वीज बील माफ करावं, याशिवाय मुलांना बसचा पास आणि शिक्षण मोफत द्यावं असं निवेदन जिल्हाधिकार्यांजना देण्यात आलं. याप्रसंगी बाळा नांदगावकर यांनी आघाडी सरकारवर टीका केली.
गृहमंत्री आर आर पाटील महाराष्ट्राचं रक्षण करण्यात संपूर्णतः अपयशी ठरले आहेत. गुन्हे वाढत आहेत मात्र गुन्ह्यांचे तपास लागत नाहीत. पुण्यातील स्फोटाचेही काही धागेदोरे अजून मिळाले नाहीत. पुणे, नाशिक, मालेगाव, मुंबई येथील स्फोटांचा विचार केला तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत श्वेतपत्रिकाच काढली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आबा गृहमंत्रालय संभाळण्यात अपयशी ठरले असून त्यांच्याकडे पुन्हा ग्रामविकास खातं द्या आणि पवारांकडे गृहखाते द्या, असा टोलाही नांदगावकर यांनी लगावला.
First Published: Friday, August 10, 2012, 20:45