पत्नीच्या वागणुकीमुळे पतीची आत्महत्या..., husband suicide in pune

पत्नीच्या वागणुकीमुळे पतीची आत्महत्या...

पत्नीच्या वागणुकीमुळे पतीची आत्महत्या...
www.24taas.com, पुणे

पुण्यात एक विचित्र घटना घडली आहे. पतीने आपल्या पत्नीच्या वागण्यामुळे आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचे कारणही तसे विचित्रच असल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या मारहाणीमुळे पतीने आत्महत्या केली. पिंपरी-चिंचवडमधल्या निगडीत ही घटना घडली आहे.

पत्नी नेहमी त्याला मारहाण करतं होती. त्यामुळं पत्नीच्या सततच्या मारहाणीला कंटाळून पतीने राहत्या घरात स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या केलेल्या पतीच्या पत्नीचे तिच्या एका महिला मैत्रिणीशी समलिंगी संबंध होते आणि यालाच कंटाळून आत्महत्या केली असल्याचे समजते. पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून या दोन्ही महिला फरार झाल्या आहेत.

First Published: Saturday, March 30, 2013, 22:32


comments powered by Disqus