वेश्याव्यवसाय करणाऱ्या आयपीएलमधील चिअरगर्लला अटक , IPL Cheer girl sex racket

वेश्याव्यवसाय करणारी आयपीएल चिअरगर्ल अटकेत

वेश्याव्यवसाय करणारी आयपीएल चिअरगर्ल अटकेत
www.24taas.com, पुणे

आयपीएल आणि त्यातील ललना... हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. आयपीएल मॅचच्या दरम्यान थिरकणाऱ्या चिअरगर्ल यांनी तर क्रिकेटकडे बघण्याचा चेहरामोहराच बदलून टाकला. मात्र याच चिअरगर्ल अनेक कृष्णकृत्यात अडकलेले असल्याचेही समोर येत आहे. कोरेगाव पार्कमधील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी आलेल्या ` चिअरगर्ल ` ला सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली. दिड लाख घेऊन हि चिअरगर्ल वेश्याव्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांच्या पथकाला या ` चिअरगर्ल ` बाबत माहिती मिळाली होती. कोरेगाव पार्क येथील हॉटेलवर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी ` चिअरगर्ल ` ला अटक केली आहे. तिला पुण्यात वेश्या व्यवसायासाठी आणणाऱ्या एका दलाल महिलेलाही अटक करण्यात आली आहे.

` आयपीएल ` च्या कोलकाता नाइट रायडर्स या संघासाठी ` चिअरगर्ल ` असलेल्या या मॉडेलने अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत एका कारच्या जाहिरातीत काम केले आहे

First Published: Thursday, October 18, 2012, 17:42


comments powered by Disqus