Last Updated: Monday, September 24, 2012, 13:18
www.24taas.com, पुणेपुण्यात पाच वर्षांच्या लहानग्याचे अपहरण आणि हत्या झाल्याचं उघड झालंय. पाषाण भागातली ही घटना आहे. पाच लाखांच्या खंडणीसाठी शुभ रावळच्या शेजारी राहणा-या दोन मुलांनीच त्याचं अपहरण केलं होतं.
शुक्रवारी संध्याकाळी शुभचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर शनिवारी रात्री शुभचा मृतदेह सापडला. याप्रकरणी ज्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं त्यातला एक आरोपी 19 वर्षांचा आहे. तर दुसरा अल्पवयीन आहे.
मौजमजेसाठी त्या दोघांनी शुभचं अपहरण केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. अपहरणानंतर त्यांनी शुभची गळा दाबून हत्या केली.
First Published: Monday, September 24, 2012, 13:18