पुरूषाचा वेश, सुनेचा सासू-सासऱ्यांवर चाकू हल्ला, knife Attack on husbands mother & father

पुरूषाचा वेश, सुनेचा सासू-सासऱ्यांवर चाकू हल्ला

पुरूषाचा वेश, सुनेचा सासू-सासऱ्यांवर चाकू हल्ला
www.24taas.com, अहमदनगर

पुरुषाच्या वेशात येऊन सुनेनं सासू सास-यांवर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या धेंडगावात घडलीय आहे. सुनेच्या चाकू हल्ल्यात सासू सासरे गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोर सुनेविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेचा पोलीस शोध घेत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील धेंडगावातील ही घटना घडली. सुनेने सासू सास-यांवर चाकूने हल्ला केला त्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. सुनेच्या हल्ल्यात सासू सासरे गंभीर जखमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सासू सासऱ्यांवर हल्ला करण्यासाठी सुनेने पुरूषाचा वेश घेतला. त्यानंतर चाकूने हल्ला करीत दोघांना जखमी केले. मात्र या हल्ल्यामागचे कारण अजूनही समजू शकलेलेल नाही. हल्लेखोर सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published: Wednesday, March 20, 2013, 13:37


comments powered by Disqus